सरकारने काही बाजार समित्या सुरू केल्या आहे, परंतु कांदा लिलाव बंद आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे सांगून प्रशासनाने कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी चाळी व पर्यायी व्यवस्था नाही. अचानक वादळ व वादळी पाऊस यामुळे कांदा भिजल्यास मोठे नुकसान होऊ शकते. हातात पैसा नाही, कांदा असूनही विकता येत नाही म्हणून आर्थिक अडचण सुरू आहे.
लासलगाव येथे कांदा लिलाव सुरू केलेले आहे. मग नगर जिल्ह्यात का नाही ? तरी प्रशासनाने जिल्ह्यातील कांदा लिलाव लवकरात लवकर सुरू करावे व शेतकऱ्यांना मदत होईल, अशी भूमिका घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. महेश नवले, प्रदीप हासे, अतुल लोहोटे, सुरेश नवले, नीलेश तळेकर, केशव वाकचौरे, अमोल पवार आदी शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील प्रशासनास निवेदन दिले.
..........अकोले कांदा............