श्रीरामपूर येथे उच्च प्रतीचा कांदा १४०० ते २०००, दुय्यम प्रतीचा ८०० ते १३५०, तृतीय प्रतीचा कांदा ३०० ते ७५० व गोल्टी कांदा ८५० ते १४५० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला. गोल्टी कांद्याचे भाव टिकून असून, या कांद्यास परराज्यातून मागणी आहे. श्रीरामपूर येथे सोमवार, बुधवार व शुक्रवार हे तीन दिवस लिलाव होतात.
टाकळीभान उपबाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे भाव वाढते निघाले. सर्वाधिक भाव २१२५ रुपये प्रति क्विंटल मिळाले. दुय्यम प्रतीचा कांदा ९०० ते १६५०, तृतीय प्रतीचा कांदा ३०० ते ८०० व गोल्टी कांदा ७०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल विकला गेला. टाकळीभान उपबाजारात मंगळवार, शुक्रवार व रविवार या तीन दिवस कांदा लिलाव होतात.
_____