शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

लालपरीतून कांद्याची सवारी; अकोलेतून पहिली बस वाशी मार्केटला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 11:19 AM

अकोले : तालुक्यातील कांदा प्रथमच ‘एसटी’ने वाशी मार्केटमध्ये सोमवारी (दि़८) रवाना झाला आहे. एसटीद्वारे शेतीमाल वाहतूक करण्याची ही तालुक्यातील प्रथमच घटना आहे.

हेमंत आवारी  / अकोले : तालुक्यातील कांदा प्रथमच ‘एसटी’ने वाशी मार्केटमध्ये सोमवारी (दि़. ८) रवाना झाला आहे. एसटीद्वारे शेतीमाल वाहतूक करण्याची ही तालुक्यातील प्रथमच घटना आहे. अकोलेतील कांद्याची लालपरीतून झालेली सवारी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून कृषीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची सुविधा निर्माण केली आहे. एसटी बसने कृषीमाल सुखरुप शहरात पोहचविला जाणार आहे. त्यासाठी अकोले आगारात एक विशेष बस माल वाहतुकीसाठी तयार करण्यात आली आहे.

 सोमवारी सायंकाळी ही बस अकोले येथून मुंबईला रवाना झाली. या बसमधून अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीतून ३०० कांदा गोण्या  म्हणजेच सुमारे १२ टन कांदा मुंबई वाशी मार्केटकडे पाठवण्यात  आला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण आभाळे यांनी दिली. शेतीमाल वाहतुकीसाठी बसेसची मागणी वाढताच आणखी बस तयार करण्यात येणार आहेत, असे अकोले आगाराकडून सांगण्यात आले.

कोरोनामुळे एसटीने प्रवास करण्यास प्रवासी धजावत नाहीत. तालुकाअंतर्गत प्रवासासाठी एसटी़ बसच्या फे-या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद पडली आहे. १ जूनपासून एकही बस तालुक्यात धावलेली नाही. 

तोटा भरुन काढण्याचा प्रयत्नएस़ टी़ महामंडळाच्या बसेस उभ्या असल्यामुळे आगाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच रिकाम्या किंवा कमी प्रवासी घेऊन बस सोडल्या तरी नुकसानीचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन बस सोडण्याचा निर्णय झाला आहे. किमान यातून तोटा भरुन निघू शकतो, असा अंदाज महामंडळाचा आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेonionकांदा