शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
3
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
4
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
5
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
6
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
7
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
8
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
9
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
10
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
11
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
12
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
13
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
14
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
15
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
16
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
17
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
19
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
20
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

आॅनलाईन दुचाकीचोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:22 AM

ओएलएक्स या वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या आॅनलाईन वेबसाईटवर दुचाकी विक्री करणाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या दुचाकी लांबवणाºया चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आणखी चोºया उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

अहमदनगर : ओएलएक्स या वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या आॅनलाईन वेबसाईटवर दुचाकी विक्री करणाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या दुचाकी लांबवणाºया चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आणखी चोºया उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.अविनाश सहादू कर्डिले (वय २०, रा. दूधसागर सोसायटी, देवी मंदिरामागे, केडगाव) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी ओएलएक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी अपलोड केलेल्या दुचाकी मालकांशी संपर्क करून गाडी घेण्याच्या बहाण्याने चोरी करायचा. शहरातील डॉ. संदीप पाटील यांनी १० जुलै रोजी आपली दुचाकी विक्रीसाठी ओएलएक्सवर टाकली होती. आरोपी कर्डिले याने ही दुचाकी घेण्याच्या बहाण्याने डॉ. पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर दुचाकीची चक्कर मारतो असे सांगून दुचाकी लांबवली.याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते. गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने या आरोपीला छापा टाकून एमआयडीसीमधील सह्याद्री चौकात दुचाकीसह पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी एकूण दोन दुचाकीसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस