पुणतांबा परिसरात प्राथमिक विद्यालय नऊ असून माध्यमिक विद्यालय तीन तर इंग्रजी माध्यमाचे विद्यालय दोन असून किमान आसपासच्या खेडेगावातील मिळून एकूण विद्यार्थी संख्या अडीच ते तीन हजाराच्या जवळपास आहेत. ऑनलाईन लिंक शेअर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्याचा प्रयत्न शाळांच्या व्यवस्थापन समिती कडून होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ७० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन तर ३० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात असून ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, अशांना स्वाध्याय पुस्तिका घरपोच करून त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे. प्रत्येक शाळेने इयत्ताप्रमाणे वर्गशिक्षकांनी ग्रुप तयार केलेले असून ग्रुपवर प्रत्येक इयत्तेचा अभ्यास दिला जाणार आहे.
......
जिल्हा परिषदेच्या शाळेत बहुतेक करून झूम, गुगल मिटवरून ऑनलाईन तासाप्रमाणे शिक्षक शिकवत आहेत.
- सोमनाथ वैद्य, केंद्रप्रमुख, पुणतांबा
.......
वडील शेतकरी असल्याने अँड्राईड मोबाईल आहे. त्यांच्या व्हाॅट्सॲप लिंक येते. वडील शेतावरून येतात तेव्हा कळते की आपल्याला हा अभ्यास दिला आहे.
- प्रज्ञा बोर्ड, विद्यार्थिनी
........
काही व्हिडिओ आम्ही सुट्टीत रेकॉर्ड केले होते. ते आता रोज यू-ट्यूब वर अपलोड करतो आणि त्यांच्या लिंक आम्ही विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांच्या व्हाॅट्स ॲपवर शाळेने तयार केलेल्या ग्रुपला शेअर करतो.
- प्रशांत बोर्डे, शिक्षक
150621\dsc_0123.jpg
?????? ????????? ??? ??????? ??????? ??????