काष्टी : पुणे जिल्ह्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे घोड धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. १७ जूनअखेर घोड धरणात २८५ एमसीएफटी (६ टक्के) उपयुक्त साठ्यात पाणी आले आहे.
घोड धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य झाला होता. यंदा पुणे जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे सध्या २०० क्युसेकने पाणी धरणात येत आहे.
घोड धरणावर मोठ्या प्रमाणावर उपसा सिंचन योजना आहेत. धरणातील पाणी पातळी स्थिर दिसत आहे. विसापूर, सीना तलावात पावसाचे पाणी आलेले नाही. या तलावात कुकडीचे पाणी सोडणे आवश्यक आहे.