शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
3
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
4
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
5
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
6
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
8
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
10
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
11
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
12
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
13
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
14
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
15
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
16
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
18
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
19
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
20
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

मेडिकल बोर्डातील केवळ एकच डॉक्टर बनवतो दिव्यांगाचा दाखला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 8:40 AM

तीन सदस्यीय बोर्डातील इतर दोन सदस्य तपासणीच करत नाहीत

सुधीर लंके अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देताना केवळ संबंधित दिव्यांग प्रकारातील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतात. त्यानंतर लगेचच रुग्णालयातील लिपिक प्रमाणपत्र बनवतात. तीनसदस्यीय मेडिकल बोर्डातील इतर दोन सदस्य दिव्यांग व्यक्तीची तपासणीच करत नाहीत व केसपेपरदेखील पाहत नाहीत, हा गंभीर मुद्दा नगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या तपासणीत समोर आला आहे. 

जिल्हा रुग्णालयात तपासणी न होताच पाथर्डी तालुक्यातील चार तरुणांना ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याचे प्रकरण जिल्ह्यात उघडकीस आले. यासंदर्भात नगर जिल्हा रुग्णालयात तीनसदस्यीय समितीने चौकशी केली. या समितीचा अहवाल ‘लोकमत’च्या हाती आला आहे. चौकशी समितीने नाक, कान, घसा विभागातील तज्ज्ञ डॉ. वैजनाथ गुरवले व डॉ. श्रीकांत पाठक, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संदीप कोकरे, डाॅ. प्रशांत तांदळे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. साजीद तांबोळी, संतोष चौधरी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अशोक कराळे आदींचे जबाब घेतले.

या सर्व डॉक्टरांनी प्रमाणपत्राची प्रक्रिया जबाबात कथन केली. त्यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तीची आम्ही तपासणी करतो. त्यानंतर केसपेपरवर तशा नोंदी करून आम्ही ही कागदपत्रे कर्मचाऱ्यांकडे सोपवतो. पुढे कर्मचारी प्रमाणपत्र बनवतात. वरील चौघे कधीही तपासणीसाठी आमच्यासमोर आलेले नाहीत.  वास्तविकत: दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी तीनसदस्यीय मेडिकल बोर्ड असते. या बोर्डात संबंधित विषयतज्ज्ञासह अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा शल्यचिकित्सकही असतात. मात्र, उर्वरित दोन अधिकारी सदर दिव्यांग व्यक्तीची तपासणी करत नाहीत व केसपेपरदेखील पाहत नाहीत, असे विषयतज्ज्ञ डॉक्टरांच्या जबाबातूनच समोर आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुपवर पासवर्ड होतो शेअर 

जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपवर ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र बनविण्यासाठीचा शासनाच्या पोर्टलचा युजर आयडी व पासवर्ड शेअर केला जातो, ही धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे हा आयडी व पासवर्ड गोपनीय कसा राहणार? असाही प्रश्न आहे