नेवासा : राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्य वारकरी संघाच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पंढरीच्या पांडुरंगाचे महाद्वार व मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे,राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावी,कीर्तन,प्रवचन,भजन करण्यास परवानगी मिळावी या मागण्यासाठी वारकरी मंचचे संस्थापक अध्यक्ष निलेश महाराज कोंडे-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका वारकरी मंचच्या वतीने तहसिलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रा.राम कार्जुले,राम महाराज खरवंडीकर,शिवप्रसाद महाराज पंडित,रामभाऊ महाराज तावरे,जनार्धन राशीनकर,गणेश नागरे,किशोर चव्हाण,शिवाजी पुंड, उपस्थित होते.