अहमदनगर : सावेडी उपनगरातील महत्त्वाचा आकाशवाणी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या कामात अनेक अडथळे होते. ते दूर करण्यात आले असून, रस्त्याच्या कामाला गती देण्याचा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी दिला.
आमदार जगताप यांनी सावेडीतील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, नगरसेवक स्वप्नील शिंदे, डॉ. श्री. सागर बोरुडे, माजी नगरसेवक तायगा शिंदे, जयंत येलूलकर, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार, निखिल वारे, सतीश शिंदे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखी, राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, रस्त्याच्या कामासाठी शासनाने साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा रस्ता उत्कृष्ट करण्यासाठी मनपाच्या अभियंत्यांनी ठेकेदाराला योग्य त्या सूचना कराव्यात. विरोधी पक्षनेते बारस्कर म्हणाले की, या रस्त्यात असलेल्या छोट्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. विजेचे खांबही स्थलांतरित करण्यात येणार असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण केले जाणार असल्याचे बारस्कर यांनी सांगितले.