अहमदनगर : क्रिकेट खेळताना आऊट झालेल्या फलंदाजाने गोलंदाजावर चक्क चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले. १० जून रोजी येथील माळीवाडा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माळीवाडा परिसरात १० जून रोजी सकाळी १० वाजता विशाल बबन हुच्चे व वैभव शाहुराव लंगोटे हे काही तरूणांसमवेत क्रिकेट खेळत होते. विशाल हुच्चे हा गोलंदाजी तर वैभव लंगोटे फलंदाजी करत होता. हुच्चे याच्या एका बॉलवर लंगोटे आऊट झाला़ याचाच राग येऊन लंगोटे याने हुच्चे याच्या पाठीत चाकूने वार केलातसेच आज पाठीत मारले उद्या पोटात चाकू मारेल अशी धमकी त्याने हुच्चे याला दिली. या घटनेनंतर हुच्चे याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी विशाल हुच्चे (वय २५,रा.ब्राह्मणगल्ली) याने दिलेल्या फिर्यादीवरून केशव लंगोटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘आऊट’ केल्याने तरूणावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:27 AM