अहमदनगर : गेल्या महिनाभरात धडक कारवाया करत पोलिसांनी आॅलआऊट मोहीम राबवत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वॉरंटमधील १९०० आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार असलेले ३८७जण ताब्यात घेण्यात आले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर, तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात (दि. २९) एप्रिलपासून आॅल आऊट मोहीम राबवली. त्यात १ जूनपर्यंतचा कारवाई आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने फरार ३८७ आरोपी अटक करण्यात आले. याशिवाय वारंटमधील १ हजार ९०० आरोपी पकडण्यात आले. ७४ कारवाया आर्म अॅक्ट कायद्याखाली करण्यात आल्या. विविध गुन्ह्यांत १६ पिस्टल जप्त करण्यात आले. २३ जीवंत राऊंड जप्त करण्यात आले. ३४ तलवारी, तसेच ३६ चाकू पोलिसांनी जप्त केले. ३११ कारवाया प्रोव्हीजन अॅक्टखाली, तर ६९ कारवाया जुगार अॅक्टनुसार करण्यात आल्या. ३५०० समन्सची बजावणी करण्यात आली असून, १५ दरोडा टाकणाऱ्या टोळ्या जेरबंद करण्यात आल्या आहेत.