संगमनेर : एका आदिवासी तरूणाचा कोरोनाने मृत्त्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरातबुडालेले होते. तरीदेखील एका इसमाने कर्ज वसुलीसाठी तरूणाच्या कुटुंबियांकडून बळजबरीने मालमोटार ताब्यात घेतली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात हा प्रकार घडला आहे.
संगमनेरातील येठेवाडी परिसरातील बजरंग आगिवले या तरुणाचा नुकताच कोरोनाने मृत्त्यू झाला. कुटुंबियांकडे एकमालमोटार आहे. ती मालमोटार कोल्हापूर येथे माल घेऊन गेली असता घारगाव येथील एका इसमाने ही मालमोटार तेथून बळजबरीने ताब्यात घेतली. आगिवले यांना मी कर्ज दिलेले आहे. मला ते वसूलकरायचे आहे, असा पवित्रा या इसमाने घेतला आहे. यामुळे आगिवले कुटुंब घाबरुन गेले आहे. हे कुटुंबआदिवासी आहे. आगिवले यांची पत्नी घारगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली असता तेथील एकउपनिरीक्षक व पोलिसाने या कुटुंबाची फिर्याद दाखल करुन घेण्यास नकार देत त्यांनाच उलटसुनावले.
विशेष म्हणजे ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, तो इसम यावेळी पोलीस उपनिरीक्षकांसोबतबसला होता. काही नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त व्यक्त केला आहे. ‘लोकमत’नेघारगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणी चौकशीकरुन तत्काळ कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.