प्रमोद आहेर, शिर्डीसार्इंच्या रूग्णसेवेचा वारसा प्रभावीपणे चालवण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या संस्थानच्या साईबाबा रूग्णालयात स्वच्छता व औषधांपाठोपाठ विश्वस्त मंडळ आता डॉक्टरांचेही आऊटसोर्सिंग करू पहात आहे़नवनियुक्त विश्वस्त मंडळाने बिघडलेली रूग्णसेवा दुरूस्त करण्याला प्रथम प्राधान्य देण्याचे संकेत दिले़ ही गोरगरीब व गरजू रूग्णांसाठी आशादायी बाब आहे़ रूग्णालयात कॉट शिल्लक नसतात, ही कामाची पावती असली तरी साईबाबांवर विश्वास ठेवून दूरदूरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची या रूग्णालयाप्रती असलेली श्रद्धा यामागे आहे़ रुग्णालयात अनेक कर्मचारी रूग्णांशी नीट बोलत नाहीत, माहिती देत नाहीत, म्हणून येथे सेवेकऱ्यांचे आऊट सोर्सिंग करण्यात आले़ विनाशुल्क व साईसेवा समजून येणारा सेवेकरी प्रामाणिकपणे येथे मदत करतोय ही आनंदाची बाब आहे, पण पगार घेऊन जो कर्मचारी नीट बोलत नाही, त्याला नीट करायचे सोडून हा आउटसोर्सिंगचा सोपा मार्ग निवडण्यात आला़औषधांच्या बाबतीत ओरड झाली, लगेच मेडिकल स्टोअर्सचे आउटसोर्सिंग़ तेथे छापील किमतीने औषधे विकतात, बाहेरच्या मेडिकलमध्ये अनेक महागडी औषधे यांच्यापेक्षा कमी दरात मिळतात़ जास्त दराने औषध विकून झालेल्या नफ्यातील काही रक्कम ते संस्थानला देतात़ रूग्णाला फायदा शून्य़ त्या ऐवजी महागडी, नियमित लागणारी औषधे, सिझरींग मटेरीयल संस्थानने लोयेस्ट ऐवजी दर्जा बघून टेंडर पद्धतीने खरेदी केले तर ते कमी किमतीत मिळेल व रूग्णालाही कमी किमतीत देता येईल़ शिर्डीत गोचीड तापाचे शेकडो रूग्ण असतांना संस्थानकडे ही कीटच उपलब्ध नाही़ तातडीच्या खर्चातून ती खरेदी करून चौकशीचे झंझट मागे लावून घेण्याची कुणाची तयारी नाही़ रूग्णालयातील राजकारणामुळे वरिष्ठांचा कनिष्ठांवर विश्वास नाही़ याबाबत स्पष्ट धोरण ठरवायला कुणाला वेळ नाही़ साईटेकच्या माध्यमातून संगणकीकरणावर करोडो रूपये खर्च करणाऱ्या रूग्णालयातील औषधांच्या स्टॉकच्या सॉफ्टवेअर पेक्षा खेड्यातील मेडिकल स्टोअर्सचे सॉफ्टवेअर अद्ययावत आहेत़ रूग्णालयात स्वच्छतेच्या तक्रारीवर उपाय म्हणून तेथेही आउटसोर्सिंगचा मंत्र मारण्यात आला़ तो किती उपयोगी पडला याची खात्री करण्यासाठी मायक्रोस्कोपची किंवा अॅडमिट होण्याचीही गरज नाही़ फक्त स्वच्छतागृहात व परिसरात डोकावून पहाण्याची गरज आहे़ डॉक्टरांना पळवून लावण्याचे षडयंत्रसाई संस्थान रूग्णालयात सेवाभावी व पूर्णवेळ डॉक्टर पाहिजेत, त्यासाठी डॉक्टरांना अपेक्षित वेतन, सुविधा व सुरक्षा द्यायला हवी़४व्हीजिटींग डॉक्टर वाढवणे म्हणजे पूर्णवेळ डॉक्टरांना पळवून लावण्याचे अदृश्य षडयंत्र आहे, असे शिर्डी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अभय शेळके यांनी सांगितले़
आजारी रूग्णालयाला आऊटसोर्सिंगचा आॅक्सिजन
By admin | Published: August 25, 2016 11:32 PM