कंजी टाक हे कोरोना बाधित झाल्यानंतर त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कंजी सेठ हे ज्येष्ठ वयोवृध्द व सतत कामामध्ये मग्न असणारे व्यक्तिमत्त्व. वयाचा विचार करता धोका पत्करत ते रुग्णालयात दाखल झाले.
उपचारादरम्यान त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली. यावेळी कुटुंब काळजीत पडले होते. मात्र कंजी सेठ यांनी मनोबलाच्या धैर्यावर कोरोनावर मात केली. उपचारादरम्यान मी निश्चितच लवकर बरा होऊन कोरोना मुक्त होणार असे ते सांगत होते. मनोबल व स्वतःच्या आत्मविश्वासामुळे ते उपचार घेत कोरोनामुक्त झाले. रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्याला खूप धीर दिल्याची भावना टाक यांनी व्यक्त केली. कोरोना आजारातून बाहेर पडण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या मित्रमंडळी, हितचिंतक व नातेवाईक यांना त्यांनी धन्यवाद दिले.