पहिल्या लाटेत जिल्हा पोलीस दलातील ३९३ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोना बाधित झाले होते. यातील ५ कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक होती. या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २८४ पोलीस बाधित झाले असून ९ जणांना मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच्या अंमलबजावणीची पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामाचे तास वाढले आहेत. गुन्ह्यांचा तपास व गुन्हेगारीला आळा घालण्याचेही नियमित काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीतही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:चे आरोग्य संभाळत कर्तव्य निभावत आहेत.
------------------------
पहिली लाट
एकूण रुग्ण - ७५०००
पोलीस - ३९३
एकूण मृत्यू - ११४३
पोलीस मृत्यू - ५
-------------
दुसरी लाट
एकूण रुग्ण - १५००००
पोलीस - २८४
एकूण मृत्यू - १४२०
पोलीस मृत्यू - ९
---------------------------------
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी...
पोलिसांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांना मास्क, सॅनिटायझर व रोगप्रतिकार गोळ्यांचे सतत वाटप केले जाते. ड्युटीवर असलेल्या पोलिसांचे मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी मागील वर्षी पोलीस ठाणेनिहाय समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना तत्काळ उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. तसेच पोलीस कर्मचारी व अधिकारी स्वत:ही नियमित आरोग्य तपासणी करून व्यायाम करणे आदी पथ्य पाळत आहेत.
-----------------------------