भास्कर पेरे हे शिवाजीराव नागवडे जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भास्करराव पेरे पुढे म्हणाले, पाटोदा ग्रामपंचायतीच्या पाच निवडणुका लढविल्या. लोकशाही मार्गाने जनसेवेची संधी मिळाली. गाव व गावातील नागरिकांचे विचार बदलून टाकले, याचा आनंद आहे. पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामापासून दूर राहण्याचा मनापासून निर्णय घेतला. आठ जागा बिनविरोध झाल्या. तीन जागांसाठी निवडणूक झाली.
माझ्या मुलीने उमेदवारी अर्ज भरला. मी त्याचवेळी तिला सांगितले, ‘तू उमेदवारी अर्ज भरला आहेस, मी या निवडणुकीत कुणाचाही प्रचार करणार नाही, मला सर्व उमेदवार सारखे आहेत.’ मी निवडणूक काळात बाहेर होतो. या निवडणुकीत आमच्या घरातील ११ जणांनी मतदानही केले नाही. मुलीचा १८ मतांनी पराभव झाला; पण मीडियाने चुकीच्या पद्धतीने चित्र रंगविले, याच्या मनात वेदना झाल्या. मीडियाने गाऊंड रिपोर्टचा अभ्यास करणे आवश्यक होते, असेही पेरे म्हणाले.
..
१९भास्कर पेरे
....