शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
2
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
3
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
4
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
6
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
7
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
8
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
9
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
10
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
11
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
12
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
13
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
14
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
15
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
16
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
17
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
18
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
19
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
20
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात

नदीजोड प्रकल्प पूर्ण करणार : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 7:21 PM

जनतेला अडाणी ठेवत काँग्रेस सरकारने खा-खा खाल्ले. आमची पाच वर्षे त्यांची खरकटे काढण्यात गेली.

नेवासा : जनतेला अडाणी ठेवत काँग्रेस सरकारने खा-खा खाल्ले. आमची पाच वर्षे त्यांची खरकटे काढण्यात गेली. आता नदीजोड प्रकल्पासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करून देशातील शेतकरी सुखी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासा फाटा येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवामोर्चाचे सचिन तांबे, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवासेनेचे नीरज नांगरे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिन्द्र म्हस्के, हरिभाऊ शेळके, नितीन जगताप, पूजा लष्करे उपस्थित होते.मुंडे म्हणाल्या,सर्जिकल स्ट्राईक हा निवडणुकीचा विषय नसून या राजवटीत मिळणारे संरक्षण हा महत्वाचा विषय आहे. ग्रामविकास खात्यांतर्गत प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाशी निगडित काम करण्याचा अनुभव मिळाला. या खात्यांतर्गत विकास निधीचा पासून राज्यात पडला. जलसंवर्धन, आरोग्य, घरकुल, रस्ते यामध्ये मोठे काम उभे केले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देखील या परिसरात दोनशे बारा कोटींचा निधी दिला त्याचे वाटप करताना कोणताही भेदभाव केला नसल्याने सर्व भागाचा विकास झाला आहे. राज्यात घरकुल वाटपाचे काम एवढे चांगले झाले की केंद्राने १० लाख घरे राज्यासाठी पुन्हा मंजूर केली असल्याने बेघर मुक्त महाराष्ट्र योजना आपण पूर्ण करत आहोत. मोदी सरकार काळात स्वच्छता अभियान, जनधन योजना या सारख्या योजनांमुळे दलाल संपले आहे. सध्या विरोधकांच्या महाखिचडीचा नेता कोण आहे हे त्यांनाच येत नाही पण आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थिर व मजबूत सरकार देणारे ठरले आहेत. खासदार लोखंडे हे गवगवा न करता काम करणारे नेते आहेत त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे.लोखंडे म्हणाले, माझी ही नववी निवडणूक असून मागील पाच वर्षांमध्ये निळवंडे च्या चारीचा मोठा प्रश्न मार्गी लावला आहे.प् ाुढील पाच वर्षात मतदार संघात पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019