शिक्षणासाठी गावक-यांनी स्वीकारले पालकत्व
By admin | Published: May 09, 2017 2:53 PM
अडचणीवर मात करण्यासाठी गावकरी धावले अन् बघता बघता ५१ हजार रुपयांची मदत काही क्षणात जमा केली. या मदतीमुळे छत्र हरपलेल्या पाल्यांच्या पंखात शिक्षणासाठी बळ संचारले.
लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मुलगी बारावीला तर मुलगा दहावीला. अशा परिस्थितीत कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या वडिलांचे अचानक निधन झाले. हा धसका सहन न झाल्याने आजोबांचा मृत्यू झाला. घरातील दोन्ही कमावते आधारच तुटल्याने कुटुंब उघड्यावर आले. त्यात आधारासाठी शेतीही नाही. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण थांबणार असल्याचे समजताच या अडचणीवर मात करण्यासाठी गावकरी धावले अन् बघता बघता ५१ हजार रुपयांची मदत काही क्षणात जमा केली. या मदतीमुळे छत्र हरपलेल्या पाल्यांच्या पंखात शिक्षणासाठी बळ संचारले. नगर तालुक्यातील कामरगाव येथील गडकर कुटुंबाची ही दुदर्र्वी घटना. भारत अशोक गडकर हे लाकुडतोडीचा व्यवसाय करत गुजराण करत. ३२ वर्र्षाच्या भारत यांना दोन महिन्यांपूर्वी अचानक मृत्यूने कवटाळले. मुलाचा मृत्यूचा धसका वडिलांना सहन झाला नाही. वडील अशोक गडकर यांनाही मृत्यू झाला. घरातील सुवर्णा बारावीत तर प्रतीक दहावीत शिक्षण घेत आहेत. कुटुंबाचे दोन्ही आधार हरवल्याने त्यांचे शिक्षण थांबणार होते. तसेच घरातील मुलांची आई अन् आजी मजुरी करतात. पण या मजुरीने शिक्षणाचा खर्चत भागणार नव्हता. ही परिस्थिती गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर तुकाराम कातोरे यांनी गावकºयांची साथ घेतली. रोहिदास ठाणगे, विठ्ठल जाधव, रामभाऊ आंधळे, बाबा गायकवाड, राजू पोटे, चद्रकांत सुतार, अभय मंडले, अशोक कातोरे, रावसाहेब बोरुडे यांनीही साथ दिली. ग्रामस्थांकडून स्वइच्छेनुसार ऐच्छिक मदत जमा केली. यामधून दशक्रिया विधीचा खर्चही करण्यात आला. तसेच गावाने दोन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारले. जमा झालेले ५१ हजार रुपये कुटुंबाकडे देण्यात आले. ग्रामस्थ प्रकाश ठाणगे, अशोक महापुरे, पोपट जाधव यांनी वर्षभरासाठी पुरेल एवढा धान्याचाही पुरवठा केला.