पारनेर : तालुक्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांसाठी भाकपच्यावतीने पारनेर तहसिल कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढण्यात आला़टॅकरने दुषित पाणीपुरवठा होत असुन तातडीने शुध्द पाणीपुरवठा करावा,जनावंरांना अनुदान दयावे,दुधाला अनुदान दयावे यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.भाकपच्यावतीने गुरूवारी पारनेर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यासाठी पारनेरच्या लाल चौकातुन प्रारंभ झाला़यावेळी पक्षाचे झेंडे घेउन महिला पुढे होत्या़यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते़लाल चौक,शिवाजी रोड,भेरवनाथ गल्ली मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयावर आला़. योवळी बोलताना आझाद ठुबे म्हणाले,दुधाला भाव नाही,जनावरांना पाणी-चारा नाही व दुष्काळाच्या खाईत गेलेले शेतकरी संकटात सापडले असुन प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालुन शेतक-यांना दुष्काळात तातडीने दुधाला अनुदान दयावे़जनावरांसाठी शेतक-यांना थेट अनुदान दयावे अशी मागणी केली़यावेळी दुध उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे,संतोष खोडदे,कैलास शेळके यांच्यासह अनेकांनी शासनाच्या धोरणावर टिका केली़यावेळी जिल्हा पीरषद सदस्या उज्वला ठुबे,गुलाबराव डेरे,गणेश कावरे,संतोष खोडदे,ेअशोक गायकवाड,आदींसह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते़गटविकास अधिकारीच लक्ष्यदुष्काळी प्रश्नांसंदर्भात असलेल्या भाकपच्या मोर्चात कॉ़आझाद ठुबे यांनी पारनेर पंचायत समीतीचे गटविकासअधिकारी विशाल तनपुरे यांनाच लक्ष्य केलेग़टविकासअधिकारी यांनी अनेक विहीरींचे व योजनांची प्रकरणे अडवली असुन त्यांनी तातडीने आपल्या वागण्यात सुधारणा केली नाही त्यांना दांडकयांनी उत्तर दिले जाईल असा इशारा दिला़यावेळी गटविकासअधिकारी विशाल तनपुरे यांना आंदोलनस्थळी बोलावण्याची कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता़मात्र सुरक्षेच्या कारणास्वत तनपुरे यांनी मोर्चाला सामोरे जाण्यास टाळले़या मोर्चात गटविकासअधिकारी लक्ष्य करण्यात येणार असल्याने पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता़.