विनोद गोळेपारनेर: डॉ. सुजय विखे यांच्या विजयाच्या वाटचालीत आमदार विजय औटी, नंदकुमार झावरे किंगमेकर ठरले. सेना-कॉँग्रेस-भाजप यांची एकी पारनेर मतदारसंघात महत्त्वाची ठरली. दुसरीकडे राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर येऊन निलेश लंके यांच्या राजकीय वाटचालीस धक्का बसला. कॉँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले.पारनेर मतदारसंघात बाळासाहेब विखे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सुजय विखे यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. विखे विजयी झाल्याने विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, काशिनाथ दाते, पं. स. सभापती राहुल झावरे, रामदास भोसले, बाबासाहेब तांबे, डॉ. भास्कर शिरोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे आदींच्या राजकीय वाटचालीस संजीवनी मिळाली. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार विजय औटी यांना २५ हजाराचे मताधिक्य होते. विखे यांना तर पारनेर तालुक्यात ३६ हजार ७०९ असे मताधिक्य मिळाले. हीच गोष्ट राष्टÑवादीला विचार करायला लावणारी आहे. मोदी फॅक्टर जरी असला तरी विधानसभा उपाध्यक्ष औटी यांची विकास कामे, विखे यांचे सर्व गट, भाजपचे कार्यकर्ते यांनी घेतलेले परिश्रम व माजी मंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी घेतलेल्या स्वतंत्र बैठका विखे यांच्या विजयात मोलाचे ठरल्या.दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते दादा कळमकर, सुजित झावरे, सभापती प्रशांत गायकवाड, उदय शेळके, निलेश लंके, अशोक सावंत, मधुकर उचाळे, गंगाराम बेलकर, दीपक पवार यांच्यातील अंतर्गत वाद निवडणुकीत कायम राहिला. यामुळे संग्राम जगताप पिछाडीवर पडले. सुजित झावरे यांनी पक्षादेश डावलल्याचे प्रकरण समोर आले आहे. या पिछेहाटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्टÑवादी काँग्रेसला एकप्रकारे धोक्याचा इशारा मिळाला आहे. निलेश लंके यांची चिंता यामुळे वाढली असणार.विधानसभेचे समीकरण बदलणारडॉ. सुजय विखे कोणते चिन्ह घेऊन लढतात यावर आमदार विजय औटी यांचे विधानसभा निवडणुकीचे गणित अवलंबून होते. सुजय यांचा भाजप व निलेश लंके यांचा राष्ट्रवादी प्रवेश या दोन्ही घटना औटी व राहुल झावरे यांना बळकटी देणाऱ्या ठरल्या. दुसरीकडे निलेश लंके राष्ट्रवादीत येऊन मताधिक्य मिळाले नाही. त्यांची फक्त गर्दी दिसली, मते मिळाली नाही. हा मतप्रवाह लंके विरोधक मांडत आहेत.की फॅक्टर काय ठरला?सेना-कॉँग्रेस-भाजप एकीचा विखेंना फायदाराष्ट्रवादीमधील गटबाजी लाभदायक. सौर ऊर्जेचा पाणीपुरवठा योजनांसाठी वापरविद्यमान आमदारपाणी प्रश्न हे सुजय विखेंचे आश्वासन मतदारांना भावले