लोकमत न्यूज नेटवर्क
अस्तगाव : राहाता तालुक्यातील केलवड गावात अनेक वर्षांपासून जाण्या-येण्यासाठी ओढ्यातून रस्ता नव्हता. शिर्डी बाह्यवळण रस्त्यामुळे ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती; परंतु गेल्या तीन वर्षांपासून ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. अखेर गावातील ओढ्यावर पूल व रस्ता प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.
पूर्वी ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, पाहुणे मंडळींना ओढा पार करून जाताना मोठी कसरत करावी लागत. आता या ओढ्यावर मोठा पूल बांधण्यात आला आहे. रस्त्याचीही दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता हा रस्ता नागरिकांसाठी सुखकर झाला आहे. केलवड गावातील हा रस्ता मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. बाह्यवळण रस्त्याच्या दोन्ही बाजूने स्पीडब्रेकर टाकले आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षित झाला आहे.
...
केलवड गावातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात ओढ्यावरून प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्यासाठी त्रास होत होता. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे आज गावात मोठ्या ओढ्यावर पूल तयार झाला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
-संगीता कांदळकर, सरपंच, केलवड.
...
२६अस्तगाव पूल
२६ अस्तगाव ओढा
...