जामखेड : शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार खाते व बँक समन्वयाने काम करत आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपर्यंत करावा व शासनाच्या पन्नास हजार रूपयांच्या प्रोत्साहनपर भत्यासाठी पात्र व्हावे. दोन लाखांवरील वसुलीसाठी सचिवांनी अध्यक्ष व संचालक यांना विश्वासात घेऊन शंभर टक्के वसुली करावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी केले. जामखेड येथे सेवा संस्थेच्या थकबाकी वसुलीबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी ते बाेलत होते. यावेळी सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर, तालुका विकास अधिकारी सरोदे, तालुका सचिव सत्तार शेख, वसुली अधिकारी नवगिरे, तालुक्यातील सर्व संस्थांचे सचिव उपस्थित होते. यावेळी अमोल राळेभात यांचा सहकार विभाग व बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
घोडेचोर म्हणाले, दोन लाखांवरील थकबाकी वसुलीसाठी कायदेशीररीत्या १०१ (१) अंतर्गत कारवाई करू. प्रसंगी थकबाकी न भरणारांची जमीन जप्त करून वसुली केली जाईल.