संगमनेर : संगमनेर बसस्थानकाचे नुतनीकरण सुरू असून येथे खासगी चारचाकी व दुचाकी वाहने उभी केल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गोपाळ उंबरकर व आगार प्रमुख राणी वर्पे यांनी बसस्थानकाच्या आवारात उभ्या केलेल्या खासगी वाहनांवर दंडात्मक सुरू केली आहे.बसस्थानकाचे नुतनीकरण सुरू असताना मालवाहू चारचाकी वाहने व बसेसला स्थानकात प्रवेश करताना येथे उभ्या केलेल्या खासगी वाहनांमुळे अडथळा होतो. यामुळे बसस्थानकाबाहेरही वाहतूक कोंडी झाल्याने छोटे-मोठे अपघात घडतात. प्रवाशांनाही यांचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ही कारवाई सुरू आहे. बसस्थानकात खासगी वाहने उभी केल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आगारप्रमुख वर्पे यांनी सांगितले.
संगमनेर बसस्थानकात खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 2:06 PM