मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील यांनी मनसेच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिंदे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयामध्ये बेड मिळत नाही, अनेक तालुक्यात व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. तसेच ऑक्सिजन व इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नसल्याने कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गंभीर परिस्थितीस जबाबदार असणारे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्यातील दोन मंत्री, खासदार, आमदार, जि. प. अध्यक्ष, नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती अशा लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत.
याप्रसंगी जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुका अध्यक्ष गणेश दिवशी, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, डॉ.संजय नवथर, गोरक्ष वेडे, स्वप्नील सोनार, राहुल दातीर, विशाल शिरसाठ, नंदू गंगावणे, भास्कर सरोदे, नीलेश सोनवणे, अमोल साबणे, ईश्वर जगताप, राजू शिंदे, रोहित गुंजाळ, संतोष आवटी, ज्ञानेश्वर काळे, सचिन जाधव, मारुती शिंदे आदी उपस्थित होते.