शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

पेट्रोलमध्ये इथेनॉल की भेसळ?

By साहेबराव नरसाळे | Published: March 06, 2018 4:06 PM

गाड्या पडतात बंद : पेट्रोल, डिझेल टाक्यांमध्ये निघते पाणी

साहेबराव नरसाळे/ अण्णा नवथरअहमदनगर : वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सध्या पेट्रोल टाकल्यानंतर गाड्यांच्या टाक्यांमध्ये पाणी निघत आहे. झटके देत गाड्या बंद पडत आहेत. त्यामुळे पेट्रोलमध्ये नक्की इथेनॉल मिक्स केले जाते की भेसळ होते, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.नगर जिल्ह्यामध्ये ३०५ पेट्रोल पंप आहेत. त्यातील भारत पेट्रोलियमचे ११५, हिंदुस्थान पेट्रोलियमचे ५७, इंडियन आॅईलचे ११४, रिलायन्सचे २, एस्सार ६ आणि आयबीपी ११ या कंपन्यांचे पेट्रोलपंप सध्या नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यात दररोज सुमारे ११ लाख लिटर पेट्रोलची विक्री होते.१ सप्टेंबर २०१० पासून पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिक्स करण्यास सरकारने परवानगी दिली होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करुन ते १० टक्के करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून १० टक्के इथेनॉल मिक्स केलेले पेट्रोल विकले जात आहे. मात्र, अलिकडच्या सहा महिन्यांपासून गाड्यांच्या टाक्यांमध्ये पाणी निघू लागले आहे. तसेच काही प्रसंगात गाड्या अचानक बंद पडत आहेत. गाडी बंद पडल्यानंतरही गाडीत पेट्रोल असल्याचे दिसते. एकतर गाडी सुरु होत नाही आणि सुरु झाली तरी काही वेळाने पुन्हा बंद पडते. ही बंद पडलेली गाडी फिटरला दाखविल्यास फिटरने टाकीचा कॉक उघडला तर टाकीतून पाण्याची धार बाहेर पडते. पूर्ण टाकी रिकामी केल्यानंतर त्यात पुन्हा पेट्रोल टाकले की गाडी सुरु होते. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात चारचाकी वाहनचालकांना तर गाडी टोर्इंग करुनच फिटरकडे न्यावी लागते.

इथेनॉल की अन्य काही.. तपासायचे कसे?

इथेनॉल मिश्रणाला पेट्रोलपंप चालकांचा विरोध नाही; परंतु पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिक्स केले आहे की अन्य काही हे तपासण्याची यंत्रणाच आपल्याकडे नाही. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केले जाते आहे, याचीही अनेकांना माहिती नाही. इथेनॉलमिश्रित पेट्रोल दुचाकी, चारचाकीमध्ये भरल्यानंतर दिवसाआड गाडी बंद पडण्याचे प्रकार समोर येत आहेत. पेट्रोल टँकमध्ये पाणी निघत असल्यामुळेही हा भेसळीचा प्रकार असल्याचा संशय अनेकांना आहे. याबाबत तक्रारीही वाढत आहेत. मात्र, या तक्रारींची दखल कोणीही घेत नाही. पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाºया इथेनॉलची शुद्धताही तपासली जाते की नाही, याबाबतही संशय आहे.

इथेनॉलचे प्रमाण वाढले पण किमती तशाच

नगरमधील प्रत्येक पेट्रोलपंपावर येणा-या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मनमाड येथील टर्मिनलमध्ये मिक्स केले जाते. तेथून ते सर्वत्र वितरीत होते. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढले आहे़ सुरुवातीला इथेनॉलचा दर २७ रुपये प्रतिलिटर ठरविण्यात आला होता. तो आता ४२ रुपये लिटर करण्यात आला आहे. ते ८० रुपये प्रति लिटर पेट्रोलमध्ये मिश्रित करून विकले जात आहे. १ लिटर पेट्रोलमध्ये १०० एमएल इथेनॉल मिश्रित केले जाते. त्यामुळे पेट्रोलचा दर किमान चार रुपयांनी कमी होणे अपेक्षित होते. मात्र, इथेनॉल मिश्रित पेट्रोल मूळ पेट्रोलच्या किमतीतच विकले जात आहे. त्यामुळे हा वरचा नफा कोणाच्या खिशात जातो, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

इंजिन बिघाडाचा आणि अपघाताचा धोका

इथेनॉलमिश्रित पेट्रोल वाहनात भरले जात आहे. त्यामुळे वाहने अचानक गुडगुड करुन बंद पडत आहेत. महामार्गावर भरधाव वेगाने वाहन असताना अचानक जर ते बंद पडले तर अपघाताचा धोका संभवतो. त्याशिवाय कार्बोरेटर आणि इंजिन खराब होण्याचा धोकाही आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिश्रित केले जाते की अन्य काही याबाबत संशय बळावला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPetrolपेट्रोल