कोपरगाव : महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारक दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचा उद्धार केला. गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षण मिळवून देत महिलांना सुशिक्षित करण्यासाठी उभे आयुष्य स्वतःला वाहून घेतले, असे प्रतिपादन संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील रामवाडी येथे रविवारी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे किशोर काळे, शोभा काळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुकुंद काळे, सचिव योगेश ससाणे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष छाया काळे, पल्लवी ससाणे उपस्थित होत्या.
काळे म्हणाले, माळी युवक संघाचे संस्थापक सचिन गुलदगड यांनी महात्मा फुले जयंती सर्वांनी घरीच थांबून साजरी करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील समाजबांधवानी घरीच महात्मा फुलेंच्या पुस्तकांचे वाचन करून जयंतीनिमित अभिवादन केले आहे.