राहुरी: मत्स्यमारीतून उत्कर्ष व्हावा म्हणून जपान तंत्रज्ञानाच्या फायबर बोटी देऊन नगर जिल्ह्यातून पायलट प्रकल्प सुरू केला जाईल. मागेल त्याला मत्स्यबीज देण्यात येणार असून प्राधान्याने सबसीडी देण्यात येईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यउद्योग मंत्री महादेव जानकर यांनी दिली.राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या सभागृहात राजश्री शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन व जलाशयात पिंजरा पध्दतीने मत्स्यपालन याविषयावर आज प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली़ त्यावेळी जानकर बोलत होते.जानकर म्हणाले, जिल्ह्यात मत्स्यव्यवसायातून एक लाख लोकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. दुस-या राज्यातून मत्स्यबीज आणण्याचे उद्योग बंद करायचा असून पुढील वर्षी अन्य राज्यांना मत्स्यबीज पुरविण्यात येईल़ लवकरच मत्स्यशेतीबाबत महाराष्ट्र देशात एक क्रमांक राहील, असेही त्यांनी सांगितले़ मत्स्यबीज सेंटरसाठी २२ हजार कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे़ इथून पुढे जे आधिकारी योजना राबविण्यात कुचराई करतील त्यांची गडचिरोलीत बदली करू व इंक्र ीमेंट रोखून धरू असा इशाराही महादेव जानकर यांनी दिला. मत्स्यव्यवसायानेच दीडपट उत्पन्न वाढणार आहे. कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली असून राज्य शासन खरेदीची हमी घेईल अशी ग्वाहीही जानकार यांनी दिली.थांबा कारवाईच करतोमहादेव जानकर यांचे संत गाडगे महाराज आश्रम शाळेत आगमन झाले. शनिवार असल्याने विद्युत पुरवठा बंद होता. विज का बंद आहे. मी येणार म्हणून अधिका-यांना माहीत नव्हते का, थांबा कारवाईच करतो अशी धमकी जानकर यांनी दिली. स्पीकरला येणा-या व्यत्ययाबाबतही आधिका-यांची त्यांनी खरडपटटी केली. तुमचे कायम असेच असते असे सांगत पुन्हा गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला.