शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

पोलीस मित्र फोर्सतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:16 AM

--------------------- सोमवंशी यांचा सत्कार अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. आर. सोमवंशी यांची न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ...

---------------------

सोमवंशी यांचा सत्कार

अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. आर. सोमवंशी यांची न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या स्वायत्त महाविद्यालयाच्या विद्या परिषदेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमरकर यांच्या आदेशाने पुढील तीन वर्षाकरिता ही नियुक्ती ग्राह्य असेल. डाॅ. सोमवंशी हे सध्या पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. अहमदनगर महाविद्यालयात ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी विभागाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रजनीश बार्नबस यांच्या हस्ते बुधवारी सोमवंशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सय्यद रजाक, उपप्राचार्य बी. एम. गायकर, डॉ. डी. बी. मोरे व उपप्राचार्य डॉ. ए. वि. नागवडे उपस्थित होते.

-----------------

वसंत शिंदे यांचे सेट परीक्षेत यश

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सेंट परीक्षेत रुद्र अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. वसंत शिंदे उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा नेते अक्षय कर्डिले, बाणेश्‍वर पतसंस्थेचे चेअरमन राजू कर्डिले, बुऱ्हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, शेंडी ग्रामपंचातचे सदस्य अविनाश शिंदे, माजी सदस्य सुनील देठे, नागरदेवळे विविध कार्य.सोसायटीचे व्हाईस चेअरमन आदिनाथ शेलार आदी उपस्थित होते.

------------

रामदिन यांना श्रद्धांजली

अहमदनगर : येथील एक शिक्षक, गायक, चित्रकार प्रमोद रामदिन यांचे गत महिन्यात निधन झाले. त्यांना ‘गाता रहे मेरा दिल ग्रुप’च्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कवयित्री डॉ. कमर सुरुर, संगीतप्रेमी कुबेर पतके, संदिप भुसे, सईद खान, सहदेवजी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांना श्रद्धांजली म्हणून हिंदी गीतांची मैफल आयोजित करण्यात आली होती. यात अमीन धाराणी, अपर्णा बालटे, समीर खान, सारिका रघुवंशी, गुलशन धाराणी, किरण उजागरे, डॉ. रेश्मा चेडे, गणेश सब्बन, सुनील भंडारी, मनोज डफळ, नीता माने, संजय माळवदे, विकास खरात, दिनेश मांजरेकर, डॉ. संतोष चेडे, संदीप भुसे, डॉ. सत्तार सय्यद, राजू सावंत, अनिल आंबेकर यांनी विविध गाणी सादर केली.