- अण्णा नवथर
अहमदनगर - नेवासा- शेवगाव रोडवरील भेंडा येथे साखर कारखान्यांच्या प्रवेशव्दारासमोर अपघात झालेल्या खड्डयात वृक्षारोपण करत प्रहारा संघटनेने गांधीगिरी करत सार्वजिनकक बांधकामव विभागाचा शनिवारी निषेध केला. रखरखत्या उन्हात उभे राहून पदाधिकाऱ्यांनी केलेले आंदोलन पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती.
नेवासा- शेवगाव रोडवरील भेंडा येथील साखर कारखान्याच्या प्रवेशव्दारासमोर चारचाकी खड्ड्यात आदळली. त्यामुळे चारचाकीचा ताबा सुटून दोन पदचाऱ्यांना धडक देऊन कार उभ्या असलेल्या कारवर आदळली. या विचित्र अपघातात दोन ठार झाले. या पार्श्वभूमीवर प्रहारचे जिल्हा संघटक अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या खड्डयामुळे अपघात झाला, त्या खड्ड्यात शनिवारी वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजिनक बांधकाम विभागासह लोप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात प्रहारचे तालुकाध्यक्ष जालिंदर आरगडे, ज्ञानेश्वर सांगळे, भेंडा शाखेचे मोतीराम शिंदे, शाखा प्रमुख संदीप पाखरे, सोमनाथ चव्हाण, अमोल ढाकणे, रावसाहेब पाटेकर, विक्रम गोंडे, बंडू वेताळ, लतीफ शेख, मोसीन पठाण, अकबर पठाण आदींचा सहभाग होता.