अहमदनगर : केद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत हरितपट्टा प्रकल्पातंर्गत सीना नदीकाठी २६ हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ६ हजार झाडे लावण्यात आली आहेत. शहरातील तापमान कमी करणे हा यामागील हेतू आहे.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत सुमारे २ कोटी १४ लाख रुपये खर्चून हरितपट्टा विकसित करण्यात येत आहे. सीना नदीकाठच्या रेल्वेस्टेशन, वारुळाचा मारुती, धर्माधिकारी मळा येथे वड, पिंपळ, कैलासपती, अशोक, अर्जुन यासारख्या २६ हजार वृक्षांची लागवड प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वेस्टेशन परिसरात ६ हजार वृक्षांची लागवड ठेकेदारामार्फत करण्यात आली आहे. वृक्षलागडीबरोबरच वनौषधींचीही लागवड केली जाणार असून, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे. झाडांची देखभाल व दुरुस्ती पुढील एक वर्षे ठेकेदार करणार आहे.
अमृत योजनेतंर्गत यापूर्वी शहरात २६ उद्याने विकसित केली आहेत. या उद्यानांमध्ये विविध प्रकारच्या २६ हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामुळे शहरातील तापमान कमी झाले असून, प्रदूषण कमी होण्यास काहीअंशी मदत झाली आहे. त्यात सीना नदीकाठी विकसित करण्यात येणाऱ्या हरितपट्ट्यांची भर पडणार असून प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे.
....
-सभापतींनी केली प्रकल्पाची पाहणी
सीना नदीवरील लोखंडी पुलाजवळ या वृक्षारोपण प्रकल्पाची पाहणी सभापती मनोज कोतकर यांनी नुकतीच केली. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, शहर अभियंता सुरेश इथापे, ठेकेदाराचे प्रतिनिधी संजय दळे आदी उपस्थित होते.
....
- सीना नदीकाठी ४५ हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे. लोखंडी पूल, धर्माधिकारी मळा व वारुळाचा मारुती या तीन ठिकाणी भारतीय वंशाची २२० प्रकारची व दोन मीटरपेक्षा जास्त उंचीची झाडे लावण्यात येणार अ.
- संजय दळे पाटील, प्रतिनिधी ठेकेदार
....
फोटो-०२ सीना नदी