अमोल गायकवाडशिरसगाव : कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीने वृक्षसंवर्धनासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. गावात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा एक झाड देऊन त्यांचा सत्कार केला जातो. हे झाड या दाम्पत्यांनी लावून त्याचे संगोपन करावयाचे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून लग्नाची आठवण म्हणून अनेक जण स्फूर्तीने वृक्षारोपण करीत आहेत.गावात वाढदिवस, बाळाचा जन्म झाल्यावरही ग्र्रामपंचायतीमार्फत त्यांना एक झाड दिले जाते. आपल्या मुलाप्रमाणे या झाडाला सांभाळा... असा संदेश दिला जातो. या उपक्रमाची सुरुवात या नवविवाहित जोडप्यांपासूनच केली आहे. यापुढे ग्रामपंचायत हा उपक्रम चालूच ठेवणार आहे. हा उपक्रम परिसरातील ग्रामपंचायतींना देखील कौतुकास्पद ठरत आहे.करंजी ग्रामपंचायीतीने वृक्षसंवर्धनासाठी हाती घेतलेला उपक्रम अतिशय सुंदर व महत्वाचा आहे. यामुळे झाडांची संख्या वाढेल. भविष्यात एक होते झाड.. असे म्हणण्याची वेळ पडणार नाही. इतर गावातील ग्रामस्थांनी हा उपक्रम चालू करावा. म्हणजे जिकडे तिकडे चोहिकडे हिरवे गार दिसेल. दुष्काळ जाणवणार नाही. -रवींद्र आगवान, उपसरपंच, करंजी.नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या जागेत झाड लावण्याचा उपक्रम अतिशय सुंदर आहे. त्या जोडप्यांना आपल्या लग्नाची आठवण राहील. हा उपक्रम मला खूप आवडला. इतर ग्रामपंचायतीने उपक्रम राबवणे गरजेचे आहे. -देविदास आगवान,सुवर्ण संजीवनी, संचालक.आम्ही सर्व ग्रामंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच विरोधी सदस्य विकास कामासाठी गावात एकत्र असतो. एकमेकांत कधीच वाद घालत नाही. सर्वांना विश्वासात घेऊन कोणतेही काम पूर्ण करण्यात येते. वृक्षारोपण हा उपक्रम आमच्या कार्यकाळात सुरू झाल्याने आम्ही आनंदी आहोत. -संजय आगवान, ग्रापंचायत सदस्य.