अहमदनगर : महापालिका हद्दीत नागरिकांच्या सहभागातून ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यतिमखाना संस्थेच्या अहमदनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य चंद्रकांत चौगुले यांनी विद्यार्थ्यांकडून प्रदूषण रोखण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत प्रतिज्ञा म्हणून घेतली.
चौगुले म्हणाले, सध्याच्या ग्लोबल वार्मिंगमुळे वातारणात दूषित झाले आहे. या दुषित वातावरणामुळे पाणी, हवा याद्वारे अनेक आजारांचा फैलाव होत असल्याने हवा - पाणी शुद्ध राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रदूषण रोखण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. शासनाच्या आदेशाचे पालन करून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे, मास्कचा वापर नियमित करावा. सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मेघा कुलकर्णी, समीना शेख, नाजीया शेख, मंगल अहिरे आदी उपस्थित होते.
------
२६ अहमदनगर कॉलेज‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत प्रतिज्ञा म्हणताना अहमदनगर विद्यालयातील विद्यार्थी.