शहरातील व्यापारी मंडळ सभागृहात सोमवारी (दि. ११) आयोजित ज्येष्ठ कवी प्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील व विमल प्रभाकर खैरे उपस्थित होते.
संगमनेरातील व्यावसायिक राजेंद्र खैरे यांचे वडील व प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांचे सासरे प्रभाकर खैरे यांनी चार- पाच दशकांपूर्वी लिहून ठेवलेल्या कविता त्यांच्या नातीला एका वहीत सापडल्या. या कवितांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खैरे परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. वयाच्या ८५ व्या वर्षी माझा कवितासंग्रह प्रकाशित होईल, असे कधीच वाटले नाही. आजवर जे काही लिहिले त्याचे चीज झाल्याची भावना प्रभाकर खैरे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रभाकर पाटील, प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. राजश्री तांबे, विनायक खैरे, प्रा. काळे आदींची भाषणे झाली. कौटुंबिक स्नेहीजनांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी, ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे, बालकुमार साहित्य संस्थेचे संदीप वाकचौरे, मराठी अध्यापक संघाचे जिजाबा हासे, दत्ता शेणकर, अनिल ठाकरे, मारुती फापाळे, छाया ढगे, काशिनाथ काळे, मोहन नेहे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. खैरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले. राजेंद्र खैरे यांनी आभार मानले.