श्रीरामपूर : कोरोना संकट व लॉकडाऊनमध्ये आपला जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शहरातील सर्व पोलीस बांधवांना मनसेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व निरीक्षक संजय सानप यांच्याकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी या वस्तू सुपुर्द केल्या. यावेळी उपाध्यक्ष सुरेश जगताप, सचिव तुषार बोबडे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष विशाल शिरसाट, सचिव डॉ. संजय नवथर, गणेश दिवसे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, राहुल दातीर उपस्थित होते. कोरोना संसर्गापासून पोलिसांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले. यावेळी पोलीस प्रशासनाने आभार मानले.
---------
फोटो ओळी : २९श्रीरामपूर
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व निरीक्षक संजय सानप यांना मास्क व सॅनिटायझर देताना मनसेचे बाबासाहेब शिंदे.
-------