अहमदनगर: महामार्गावर वाहनचालकांना अडवून त्यांची लुटमार करणाऱ्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री बीड येथून जेरबंद केले़ आरोपींकडून गुन्ह्यातील १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़परशुराम उर्फ प्रशांत मोहन गायकवाड (वय १९रा़ एकनाथवाडी ता़ पाथर्डी़ हल्ली रा़ बीड), इस्माईल मीर शेख (वय ३५रा़ संजयनगर गेवराई जि़ बीड), तुकाराम अशोक पांचाळ (वय २९ रा़ पैठण), रामेश्वर प्रल्हाद लाटे (वय ३५ रा़ बीड) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत़या चौघांसह त्यांचे साथीदार गणेश मोतीराम गायकवाड व भीमा सादू लवांडे (फराऱ दोघे रा़ बीड) यांनी २४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटात सरकारी अधिकारी कृष्णात मारुती कणसे (वय ४५रा़ औरंगाबाद) यांच्या वाहनाला इंडिया कार आडवी लावून अडविले होते़यावेळी कणसे यांना मारहाण करत त्यांची क्रेटा कार, गॉगल व फोन चोरून नेला होता़ याबाबत कणसे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़
महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:20 PM