शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

पोलिसांनी केला ४० किलोमीटरचा पाठलाग; जामखेडच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 3:51 PM

दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्याकांडातील अंतरिम जामिनावर फरार असलेला आरोपी काकासाहेब गर्जे यास पोलिसांनी ४०  किलोमीटर पाठलाग करून जातेगाव येथे पकडले. जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ रोजी हे दुहेरी हत्याकांड झाले होते. यातील काही आरोपींना यापूर्वीच अटक झाली आहे.

जामखेड : दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्याकांडातील अंतरिम जामिनावर फरार असलेला आरोपी काकासाहेब गर्जे यास पोलिसांनी ४०  किलोमीटर पाठलाग करून जातेगाव येथे पकडले. जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ रोजी हे दुहेरी हत्याकांड झाले होते. यातील काही आरोपींना यापूर्वीच अटक झाली आहे.शहरातील बीड रस्त्यालगत असलेल्या चहाच्या दुकानात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात हे मित्रांसोबत बसले असताना २८ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी जुन्या भांडणातून गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जामखेडचा माजी सरपंच कैलास माने, उल्हास माने, प्रकाश माने, दत्ता गायकवाड, सचिन जाधव, बापू काळे, गोविंद गायकवाड, विजय सावंत आदी आरोपी अटक केले आहेत.जामखेड बाजार समितीचा संचालक असलेला काकासाहेब बबन गर्जे हा हत्याकांडातील पुरवणी यादीतील आरोपी होता. तो फरार होता. सात महिन्यापूर्वी त्याला अंतरिम जामीन नामंजूर झाल्यानंतर तो फरार होता. काकासाहेब गर्जे हा पारगाव (ता.वाशी, जि. उस्मानाबाद) येथे वावरत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना मिळाली होती. त्यानुसार सातव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून त्यांना तीन दिवसांपूर्वीच उस्मानाबादला रवाना केले होते.तीन दिवसांपासून पोलीस पथक गर्जे याच्यावर नजर ठेवून होते. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास गर्जे हा पारगाव येथे मोटारसायकलवरून गावात येत होता. त्याचवेळी त्याला पोलीस आल्याची चाहूल लागली. त्याने मोटारसायकलवरून धूम ठोकली. पोलीस पथकाने चाळीस किमी पाठलाग करून त्याला अखेर जामखेड तालुक्यातील जातेगाव शिवारात जेरबंद केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे व त्यांचे सहकारी पोलीस नाईक गणेश साने, भरत कांबळे, लहू खरात, अप्पासाहेब कोळेकर, उदय घोडके, आदित्य बेलेकर, रत्नमाला हराळे, सागर जंगम, नमिता पवार, केशव व्हरकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडCrime Newsगुन्हेगारी