राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा पोलीस भरती घेण्यासाठी घोषणा केल्या. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलीस भरती घेण्याची घोषणा केली आहे; परंतु तरीही पोलीस भरती प्रक्रियेची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये पोलीस भरतीच्या अनिश्चिततेबाबत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असून, त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबांतील आहेत. त्यांना शहरांमध्ये जाऊन पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणे अवघड बनले असून, कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे, असे निवेदन ध्येय लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लहानू सदगीर यांनी प्रशासनाला देत आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना मागण्यांचे निवेदन देत ५ एप्रिलला प्रांत कचेरीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पोलीस भरतीसाठी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:20 AM