जामखेड : जामखेड तालुक्यातील नान्नज दूरक्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांचे रविवारी आमदार रोहित पवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आ. पवार म्हणाले, जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना राहण्यासाठी चांगली सुविधा आसावी, यासाठी गृहनिर्माण विभागाच्यावतीने ८९ लाख रुपयांची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. पोलिसांच्या निवासाची व्यवस्था झाल्याने नान्नज व परिसरात एखादी घटना घडली की पोलीस तत्काळ उपलब्ध होतील. यावेळी सरपंच महेंद्र मोहळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, जवळकेचे सरपंच सुभाष माने, बोर्लेचे सरपंच दिलीप काकडे, उपसरपंच संजय साठे, त्रिंबक कुमटकर, माजी उपसरपंच दादाराजे राजेभोसले, ग्रामपंचायत सदस्य लियाकत शेख, दत्तात्रय मोहळकर, संतोष मोहोळकर, अतुल मंलगनेर, प्रदीप दळवी, दयानंद कथले, नय्युमभाई शेख, गणेश डोंगरे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजयकुमार कांबळे, शाखा अभियंता बाबूराव महाडिक,
दयानंद कवाळे आदी उपस्थित होते.
फोटो ०४ जामखेड
ओळी-
नान्नज दूरक्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांचे रविवारी आमदार रोहित पवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.