शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

संगमनेरातून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी तीन वाहने पोलिसांनी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 7:57 PM

संगमनेर : लॉकडाऊन काळात संगमनेरातून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी तीन वाहने पोलिसांनी पकडली. ही कारवाई नाशिक  जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांनी केली. ९ ते १४ एप्रिल दरम्यान पकडलेल्या तीन वाहनांतून सुमारे दोन टन मांस जप्त करत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने लॉकडाऊन काळातही संगमनेरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे एकदा पुन्हा समोर आले आहे.

संगमनेर : लॉकडाऊन काळात संगमनेरातून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी तीन वाहने पोलिसांनी पकडली. ही कारवाई नाशिक  जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांनी केली. ९ ते १४ एप्रिल दरम्यान पकडलेल्या तीन वाहनांतून सुमारे दोन टन मांस जप्त करत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने लॉकडाऊन काळातही संगमनेरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे एकदा पुन्हा समोर आले आहे.  अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारातील संगमनेर-सिन्नर रस्ता, निमोण-तळेगाव रस्ता येथे कारवाई करण्यात आली. ९ एर्प्रिल ला संध्याकाळी सातच्या सुमारास अझरूद्दीन जमालुद्दीन शेख (वय २७), अहसान मोहम्मद कुरेशी (वय २२) (दोघेही रा. कुर्ला पुर्व, कुरेशी नगर, सारा रहिवासी सेवा संघ, खोली नंबर १२२, मुंबई) हे आयशर टेम्पोतुन (एम. एच. ०३, सी. व्ही. ४६४४) मुंबईकडे मांस घेऊन चालले होते. हा टेम्पो पोलिसांनी पकडत त्यातील पाच लाख ४८ हजार रुपए किंमतीचे ५ हजार ४८० किलो मांस व तीन लाख ५० हजार रूपयांचा टेम्पो असा एकुण आठ लाख ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभय मुरलीधर ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे.     १३ एप्रिल ला रात्री पावणे अकराच्या सुमारास मोहमद युनुस याकुब कुरेशी (वय ४२), महेशकुमार जयदेवप्रसाद शर्मा (वय २६) (दोघेही रा. कुरेशी नगर, मोहमद चाळ, कसाईवाडा, कुर्ला, मुंबई) हे टाटा मालट्रकमधून (एम. एच. ०३, सी. व्ही. ४७४९) मुंबईकडे मांस घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना पकडत मालट्रक मधील दहा लाख रुपए किंमतीचे दहा हजार किलो मांस व दहा लाखांचा टेम्पो असा एकुण वीस लाख रुपए किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल रामनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे.     १४ एप्रिल ला रात्री सव्वा नऊच्या सुमारास इक्बाल अब्दुल रहमान खान (वय २९, रा. इंदिरानगर, बरमासेल रेल्वे लाईन, कसाईवाडा, कुरेशी नगर, कुर्ला पुर्व, मुंबई) अहेसान मोहमद कुरेशी (वय २२, मुुळ रा. गौंडा वस्ती, उत्तरप्रदेश, हल्ली रा. कुरेशीनगर मोहमद चाळ, कसाईवाडा, कुर्ला, मुंबई) हे दोघे आयशर टेम्पोतून ( एम. एच. ४८, ए. जी. ६७२६) मुंबईकडे मांस घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले. त्यातील पाच लाख रुपए किंमतीचे पाच हजार किलो मांस व चार लाख ५० हजार रुपए किंमतीचा टेम्पो असा एकुण नऊ लाख ५० हजार रुपए किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई सुधाकर शंकर चव्हाणके यांनी फिर्याद दिली आहे.--- भाजीपाल्या खाली लपवले मांस    संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांमध्ये जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात या तीन वाहनांतून मुंबईकडे नेण्यात येत होत. कुठलाही संशय येवू नये म्हणून वाहनांमध्ये भाजीपाल्याच्या खाली लपवून हे मांस नेले जात होते. वावी पोलीस ठाण्याचे सहायक  पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत वावी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेले मांस हे गोवशांचे आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.