शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

पोलिसांनी अडविली जिल्हाधिका-यांची कार;  झाले कामाचे कौतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 6:16 PM

लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके हे स्वत: पथकासह तैनात होते.  याच वेळी पोलिसांना समोरून एक कार येताना दिसते. पोलीस इशारा करून ती कार अडवितात.  पोलीस पुढे काही कारवाई करणार तोच त्या कारमधून चक्क जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उतरताना दिसले. यानंतर द्विवेदी यांंनी पोलीस कर्मचा-यांजवळ येऊन त्यांच्या कामाचे कौतूक केले.

अहमदनगर : नगर शहरातील कोठला परिसरात शनिवारी  (दि. ५ एप्रिल) रात्री अकरा वाजता  लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके हे स्वत: पथकासह तैनात होते.  याच वेळी पोलिसांना समोरून एक कार येताना दिसते.  पोलीस इशारा करून ती कार अडवितात.  पोलीस पुढे काही कारवाई करणार तोच त्या कारमधून चक्क जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उतरताना दिसले. यानंतर द्विवेदी यांंनी पोलीस कर्मचा-यांजवळ येऊन त्यांच्या कामाचे कौतूक केले.रस्त्यात वाहन अडविले म्हणून नगर शहरात पोलिसांशी दररोज अनेक जण हुज्जत घालताना दिसतात.  येथे मात्र कार अडविल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी उपधीक्षक मिटके व  इतर पोलीस कर्मचा-यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतूक करीत समाजासाठी एक चांगला संदेश दिला आहे. कोरोना साथीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत. जमावबंदी, संचारबंदीसह शहरांसह ग्रामीण भागातही लॉकडाऊन आहे.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे रात्रंदिवस परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहेत. तसेच ते स्वत: रस्त्यावर उतरून आदेशाच्या अंमलबजावणीबाबत पोलिसांसह इतर शासकीय कर्मचा-यांना वेळोवेळी सूचना देत आहेत.  रात्री शहरातील शहरातील परिस्थिती काय आहे? नागरिक रस्त्यावर दिसतात का? पोलीस बंदोबस्त कसा आहे. हे पाण्यासाठी जिल्हाधिकारी रात्री खासगी कारने स्वत: ड्रायव्हिंग करीत फेरफटका मारतात.  शनिवारी रात्रीही खासगी कारमधून शहरातील परिस्थिती पाहत असताना पोलिसांची सतर्कता जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आली.  कारच्यावरती दिवा नसल्याने त्या कारमध्ये कोण आहे? याची कल्पना पोलीस अधीक्षक संदीप मिटके व कर्मचा-यांना नव्हती.  विशेष म्हणजे यावेळी जिल्हाधिकारी स्वत: ही करत चालवित होते. पोलिसांनी कार अडविल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांसाठी खडा पहारा देणारे पोलीस अधीक्षक संदीप मिटके व इतर पोलीस कर्मचा-यांचे कौतूक केले.

शनिवारी रात्री नगर शहरात खासगी कारमधून फेरफटका मारत असताना पोलिसांनी माझी कार अडविली. यावेळी पोलीस यंत्रणेची सतर्कता निदर्शनास आली.  यावेळी मी तेथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे कौतूक केले.  कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी जनतेसाठी तैनात असलेले पोलीस व प्रशासनाला जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांंनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या