नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ झालेल्या कंटेनर व पोलीस वाहनाच्या अपघातात जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले. केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कर्मचा-यांना बंदोबस्तासाठी नगरला रवाना करण्यात आले होते. हे कर्मचारी जळगावकडे परतत असताना सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर - औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ झालेल्या पोलीस वाहन( क्र.एम.एच १९, सी.वाय- ०३७६) व कंटेनर (सी.जी. -०७ सी.ए. - ३४८५) अपघातात अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहन या वाहनाचे मोठे नुकसान झाले. जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे सतरा पोलीस कर्मचारी दि.७ एप्रिल रोजी नगर येथे बंदोबस्त कमी आले होते. मंगळवारी सकाळी नगर येथील बंदोबस्त करून जळगाव कडे निघाले होते. यामध्ये अमोल भोसले, मनोज पाटील, सागर पाटील, विजय बच्चाव, अशोक मोरे, महेंद्र उमाळे, किरण मोरे, मनोज तडवी, शामराव उखलभील, प्रदीपकुमार चव्हाण, चालक हेमंत पाटील हे जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नेवासा पोलीसांनी घटनास्थळी तातडीने जाऊन अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी ग्रामीण रुग्णलयात जाऊन जखमी कर्मचा-यांची विचारपूस केली.
औरंगाबाद महामार्गावर पोलीस व्हॅनला अपघातात ११ पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:48 PM
नगर - औरंगाबाद महामार्गावरील माळीचिंचोरा (ता. नेवासा) शिवारात कंटेनर व पोलीस वाहनाची धडक झाली.
ठळक मुद्दे कंटेनर व पोलीस वाहनाची धडक