९ एप्रिलला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पिंपळगाव जोगेचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १० मे दरम्यान सुटणार आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनुराधा नागवडे यांनी भूमिका मांडली.
नागवडे म्हणाल्या, कुकडी घोडच्या पाणीप्रश्नाचे राजकीय भांडवल नेत्यांनी स्वहित साधले. काहींनी तर टाईमपास म्हणून वापर केला. हा कलगीतुरा आणि टाईमपास आता युवक शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. यामधून फलित होत नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास उडाला आहे. हा प्रश्न निकाली काढून श्रीगोंदा सुजलाम् सुफलाम् करण्याच्या भावनेने नेत्यांनी एकत्र यावे. आमच्याकडे कुणाला येण्याची अॅलर्जी असेल तर एकत्रित लढ्यासाठी आमची चार पावले पुढे जाण्याची तयारी आहे.
भविष्यात आमच्याबरोबर कोणी आले नाहीतरी आपण स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या स्वप्नातील सुजलाम् सुफलाम् तालुका करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. या लढ्यात युवक, महिला, नवउद्योजकांना बरोबर घेणार आहे.
यावेळी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, धनसिंग भोयटे, आदेश नागवडे, स्मितल वाबळे, हेमंत नलगे, विठ्ठलराव गायकवाड उपस्थित होते.
...............
कुकडीचे आवर्तन आताच सोडा
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मे महिन्यात आवर्तन सोडण्यावर निर्णय घेण्यात आला. आता पिकांना पाण्याची गरज आहे. मग पीक जळाल्यावर आवर्तन कशासाठी सोडता. कुकडीचे आवर्तन १५ एप्रिलपासून सोडण्याची गरज आहे.
..........
कोरोना सेंटर
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मुलींचे वसतिगृह उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती अनुराधा नागवडे यांनी दिली.
फोटो- ११ अनुराधा नागवडे