आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २३ - शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुणतांबा येथील शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली़ तसेच जीसएटी अधिवेशनातही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी योग्य वेळी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे़ तरीही शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे़ यात विरोधक राजकरण करीत आहेत, अशी टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले़भाजपच्या शिवार संवाद यात्रेच्या नियोजन बैठकीतनंतर मंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्म्क धोरण राबवित आहे़ शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे़ लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेणार आहे़ सरकार शेतकऱ्यांना सक्षम करीत आहे़ मात्र, विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते सरकारवर बेछूट आरोप करीत असल्याचे शिंदे म्हणाले़ यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भानुदास बेरड, नगराध्यक्ष नामदेव राऊत, सत्यजित कदम, ममता पिपाडा आदी उपस्थित होते़
शेतकरी संप हा विरोधकांचे राजकारण- राम शिंदे
By admin | Published: May 23, 2017 2:45 PM