जामखेड : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी ८२.४७ टक्के मतदान शांततेत पार पडले. नायगाव व डोणगाव येथे सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाला होता
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी १० ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या. त्यामुळे ३९ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. यासाठी १२८ मतदान केंद्रे नियुक्त करण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण ६७ हजार ३६८ मतदार होते. यापैकी पुरुष मतदार ३६ हजार १४७ आहेत. यातील २९ हजार ९१० जणांनी मतदान केले. याची टक्केवारी ८२.७५ आहे, तर स्त्री मतदार ३१ हजार २२१ आहेत. यापैकी २५ हजार ६४७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी ८२.१५ टक्के आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केले. मतदान प्रक्रिया सकाळी साडेसात वाजता सुरू झाली. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजता ४१.७७ टक्के, साडेतीन वाजेपर्यंत ६५.०६ टक्के, तर पाच वाजेपर्यंत ७८ टक्के सरासरी मतदान झाले होते. साडेपाचपर्यंत ८२.४७ टक्के मतदान झाले.
खर्डा येथे ७३ टक्के, पिंपरखेड ८८.५२, जातेगाव ७९, घोडेगाव ८०, मोहरी ९०, बोर्ले ९२, नायगाव ८७, साकत ८२, अरणगाव ८२ टक्के, असे महत्त्वाच्या गावांत मतदान झाले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे सतर्क होते.