शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पडकी घरे, चिखलमय रस्ते, तुंबलेल्या गटारी : पोलीस कॉलनीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 7:13 PM

तुटलेली कौले, उखणलेल्या भिंती, चिखलमय रस्ते, तुंबलेल्या गटारी आणि घाणीचे साम्राज्य अशी भयानक अवस्था नगर शहरातील पोलीस कॉलनीची आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर: तुटलेली कौले, उखणलेल्या भिंती, चिखलमय रस्ते, तुंबलेल्या गटारी आणि घाणीचे साम्राज्य अशी भयानक अवस्था नगर शहरातील पोलीस कॉलनीची आहे़ याच पोलीस कॉलनीत गुरुवारी दुपारी पोलीस हवालदार सुनील कुºहे यांची मुलगी पूजा हिचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला़ या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे़पोलीस कॉलनीत शुक्रवारी सकाळीच महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले़ विजेच्या तारांना अडचणीचे ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या तर तुटलेल्या तारा दुरुस्त केल्या़ शुक्रवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पोलीस कॉलनीला भेट देऊन पाहणी केली़ यावेळी पोलीस कुटुंबीयांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या़ या कॉलनीत पाणी वेळेवर येत नाही, रस्ते खराब झालेले आहेत़ महापालिका कचरा उचलून नेत नाही, सर्वत्र घाण आहे़ आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अशा तक्रारी केल्या़ पोलीस बॉईज असोसिएशनच्या सदस्यांनीही येथे कुठल्याच सुविधा दिल्या जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला़ या विषयावर सिंधू यांनी सायंकाळी अधीक्षक कार्यालयात महावितरण, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे सांगितले़घटनेच्या एक दिवस आधी दिली होती तक्रारपूजा कुºहे हिच्या मृत्युच्या आधी सहायक फौजदार डी़एफ पाठक राजगुरू यांनी महावितरणच्या दिल्ली गेट येथील सहायक अभियंता कार्यालयात तक्रार दिली होती़ १० मे रोजी झालेल्या पावसामुळे पोलीस कॉलनीतील तारा तुटलेल्या आहेत़ तीन दिवसांपासून येथे वीज नाही़ या आधी तारा तुटून एका म्हशीचा मृत्यू झाला होता़ याची दखल घेऊन तातडीने येथील वीज तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती़ महावितरणच्या अधिकाºयांनी या तक्रारीची दखल घेतली असती तर पूजा हिचा जीव वाचला असता़़़तर आमचे मतदान मागायला येऊ नकाच्पोलीस कॉलनीत शुक्रवारी महापालिकेचे कचरा व्यवस्थापन प्रमुख सुरेश इथापे आले होते़ यावेळी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला़ लोकप्रतिनिधींना आमचे मतदान हवे असते मात्र आम्हाला येथे सुविधा दिल्या जात नाहीत़ येणाºया काळात आवश्यक त्या सुविधा मिळाल्या नाही तर आमचे मतदान मागायला येऊ नका़ यादीतून आमची नावे वगळून टाका असा संताप व्यक्त करण्यात आला़सर्वच घरे बनलीत धोकादायकच्पोलीस कॉलनीत पोलीस कर्मचाºयांसाठी ५१२ घरे आहेत़ या ठिकाणी साडेतीनशे पोलिसांचे कुटुंबीय राहतात़ हे घरे १०० वर्षांपूर्वीचे आहेत़ त्यामुळे ही संपूर्ण कॉलनीच धोकादायक बनली आहे़ या ठिकाणी पोलिसांसाठी नवीन घरांना मंजुरी मिळालेली आहे़ या कामाला मात्र अजून मुहुर्त मिळालेला नाही़ दरम्यान तीन दिवसांपूर्वी याच कॉलनीत राहणारा ओम शिंदे यालाही विजेचा धक्का बसल्याचे त्याने सांगितले़पोलीस कॉलनीत कोणत्याच मुलभूत सुविधा मिळत नाहीत़ पावसाळ्यात तर सर्वत्र पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढतो़ त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात़ आम्हाला आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात़ -वैशाली गारुडकर, रहिवासीयेथील कचरा उचलला जात नाही, रस्ते व्यवस्थित नाहीत, विजेच्या तारा वारंवार तुटतात, पाणी वेळेवर मिळत नाही़ या कॉलनीत राहणे अवघड झाले आहे़ - ज्योती कवडे, रहिवासीपोलीस कॉलनीतील तुंबलेल्या गटारींमुळे खराब पाणी नळांमध्ये जाते़ मूलभूत सुविधांबाबत महावितरण, बांधकाम आणि महापालिका यांना वारंवार तक्रारी करूनही ते दखल घेत नाहीत़ सुविधा नसल्याने पोलीस कॉलनीतील सर्वच रहिवासी हैराण झाले आहेत़ प्रशासनाने आमच्या मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी़ -नितीन खंडागळे, अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशनपोलीस कॉलनीत पुन्हा काही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़ वीजप्रवाह सुरळीत करून घरांवर वाढलेल्या झांडांच्या फांद्या तोडल्या आहेत़ या ठिकाणी नवीन घर प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे़ येत्या काही दिवसांत या प्रकल्पाचे काम सुरू होईल़ -अरुण जगताप, पोलीस उपाधीक्षक(गृह)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस