रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या खडीचे प्रमाण कमी असून, पाणी मारून रोलिंग केले नाही, तर काही ठिकाणी अल्प प्रमाणात डांबर वापरले आहे. सीडी वर्कच्या कामात पाइपांना काँक्रिटीकरण व्यवस्थित नाही. शासकीय सुटीच्या दिवशी महत्त्वाचे काम सुरू असते. याठिकाणी कोणीही शासकीय कर्मचारी उपस्थित नाही. एक कोटी तीस लाख रुपये अंदाजपत्रकाचे २,६५० मीटरचे भांबोरा ते दुधोडी या रस्त्याचे काम वीस महिन्यांपासून पूर्वी सुरू झाले होते.
एवढ्या मोठ्या अंदाजपत्रकाच्या कामात एक साधा माहिती फलकही रस्त्याच्या कडेला कुठे दिसत नाही. हे काम कोणत्या एजन्सीने घेतलेले आहे, किती अंदाजपत्रकाचे आहे, कसे आहे, याची कल्पना नागरिकांसह ग्रामपंचायतलाही नाही. मजबुतीकरण झाल्यानंतर ते दर्जेदार व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
..........
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच येथे डांबरीकरण होत आहे. उजनी बॅक वॉटर परिसरात असल्याने रस्ते खचतात यासाठी अंदाजपत्रकानुसार काम दर्जेदार व्हावे.
-माधुरी दत्तात्रय लोंढे, सरपंच, ग्रामपंचायत भांबोरा
........
हा महत्त्वाचा रस्ता आहे. कामाची पाहणी करून ते दर्जेदार करून घेण्यात येईल.
-अमित निमकर, उपअभियंता, विभाग कर्जत
फोटो : कर्जत१, २
फिरंगाईनगर (भांबोरा, ता. कर्जत) येथील नवीन खडीकरण झालेला खराब रस्ता.
छायाचित्र
सुटीच्या दिवशी जुन्या खडीवर पाणी न मारता रोलिंग व लगेच डांबर.