अकोले तालुक्यातील शेणीत येथील डॉ. राजेंद्र प्रसाद आश्रमशाळेत पुणे येथील लायन्स क्लब फ्युचर यांच्या वतीने लायन्स क्वेस्ट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ८५ हजार रुपयांचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी भंडारी बोलत होते. अध्यक्षस्थानी सचिव टी.एन. कानवडे होते. यावेळी पुणे फ्युचर लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय इनामदार, आर.के. शाह, श्रीनिवास पघडाल, सुनील ओक, मेघा व दिलीप आंबवले, माधुरी रहाणे, महेश राहणे, संजय असावा, एन.डी. बेल्हेकर, एम.के. बारेकर उपस्थित होते. अशोक मिस्त्री यांनी प्रास्ताविक केले. युवराज गभाले यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय आसावा यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांना अशोक मिस्त्री यांच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले.
युवकांमध्ये सकारात्मक विचार वृद्धिंगत व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:14 AM