लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) व्हॉटस् अॅपवर व्हायरल केल्याने, संगमनेरचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश काळू शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली.सरकारी सेवकावर राज्यात प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाली आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे रमेश शिंदे हे सध्या अंगरक्षक आहेत. थोरात मंत्री असल्यापासून ते त्यांचे अंगरक्षक आहेत. शिंदे यांनी नेमकी कोणती पोस्ट व्हायरल केली, याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. संबंधित मजकूर अनेक ग्रुपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली. ही पोस्ट शिंदे यांच्या मोबाइलवरून व्हायरल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पंतप्रधान व संवैधानिक पदावरील व्यक्तींवर शासकीय सेवकाने जाहीर टिप्पणी करू नये, असा सेवानियम आहे.भाजपाच्या तक्रारीनंतर चौकशीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर, संगमनेरच्या भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी अशोक शिंदे, अॅड. गौरव मालपाणी, दीपेश ताटकर यांनी २२ सप्टेंबरला संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.त्याची प्रत भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, खा.दिलीप गांधी यांना देण्यात आली होती. त्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे केली होती.
मोदींविरुद्ध पोस्ट; पोलीस निलंबित, संगमनेरमधील कॉन्स्टेबल : व्हॉटस् अॅपवर व्हायरल; माजी मंत्री थोरात यांचा अंगरक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 4:35 AM