अहमदनगर : शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी सावेडी येथील श्री. समर्थ विद्या मंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचे पोवाडे सादर केली. शिक्षकांनी शिवचरित्रातील निवडक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीस समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डी.आर. कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सोनटक्के उपस्थित होते. यावेळी डी. आर. कुलकर्णी म्हणाले, शिवरायांच्या अंगी भक्ती, शक्ती, युक्ती आणि संस्कार हे गुण होते. त्यांच्या या गुणामुळेच ते आपल्या जीवनात यशस्वी झाले.
मुख्याध्यापक दुर्योधन कासार यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक गणेश पारधे व अमोल बागुल यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी साईराज सरडे याने पोवाड्यातून शिवराय-अफजलखान भेट वर्णन केली. सई शिनगारे हिने शिवरायांच्या जीवनातील काही प्रसंग भाषणातून नजरेसमोर उभे केले. यावेळी प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. साईराज सरडे, अर्णव पवळ, सर्वेश मुटकुळे, समर्थ पांडव, साई सांगळे, सई शिनगारे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. रघुनाथ चांदेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भगवान जाधव यांनी आभार मानले.
--------
फोटो- २० समर्थ स्कूल
सावेडीतील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करताना डी. आर. कुलकर्णी. समवेत सुरेश क्षीरसागर, मुख्याध्यापक दुर्योधन कासार, सोनटक्के आदी.