शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
अखेर भाजपला उमेदवार भेटला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
3
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
4
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
5
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
6
"भाजपाच्या आशीर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’", नाना पटोलेंचा आरोप  
7
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
8
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
9
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
10
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
11
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
2043 पर्यंत या देशांवर मुस्लिमांचे शासन येईल; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी...
13
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
14
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
15
देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता
16
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
17
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
18
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
20
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  

राज्याच्या मंत्रिमंडळात कायमच नगर ‘पॉवरफुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 5:15 PM

नगर जिल्ह्याला रामराव आदिक यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील नेत्यांनी आलटून- पालटून महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सक्षमपणे संभाळली. ही परंपरा जिल्ह्यातील नेत्यांनी टिकवून ठेवली.

अण्णा नवथर। अहमदनगर : नगर जिल्ह्याला रामराव आदिक यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील नेत्यांनी आलटून- पालटून महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सक्षमपणे संभाळली. ही परंपरा जिल्ह्यातील नेत्यांनी टिकवून ठेवली. ती आजतागायत कायम असून, महसूल, नगरविकास आणि जलसंधारण, या तिन्ही महत्वाच्या खात्यांवर आता नगर जिल्ह्याची छाप दिसणार आहे. तिन्ही खात्यांच्या मंत्र्यांकडून नगर जिल्ह्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.नगर जिल्हा हा कुरघोडीच्या राजकारणासाठी ओळखला जात असला तरी राज्याच्या राजकारणात मात्र नगरी नेत्यांची नेहमीच छाप राहिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील नेते रामराव आदिक यांच्या रुपाने सन १९८३ मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. ते दोन वर्षे उपमुख्यमंत्री राहिले. महत्वाच्या खात्यांसह उपमुख्यमंत्री पदापर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी मजल मारली. शेवगाव येथील बाळासाहेब भारदे यांच्या रुपाने नगर जिल्ह्याने पहिल्यांदा मंत्रिमंडळात खाते उघडले. पहिल्या मंत्रिमंडळात सहकार खाते व विधानसभेचे अध्यक्षपद ही पदे भारदे यांनी भूषविली. त्याचबरोबर बी. जे. खताळ, बाबूराव भारस्कर, आबासाहेब निंबाळकर, गोविंदराव आदिक, शंकरराव काळे, बबनराव ढाकणे, अण्णासाहेब म्हस्के, एस.एम. आय. असीर, शंकरराव कोल्हे, मधुकरराव पिचड, अनिल राठोड, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपतुे, शिवाजी कर्डिले, राम शिंदे हा जिल्ह्यातील मंत्र्यांचा चढता आलेख निश्चित गौरवास्पद आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नगर जिल्ह्याने काहीकाळ विरोधी भूमिकाही बजावली. पाथर्डीचे बबनराव ढाकणे यांच्या रुपाने पहिल्यांदा विरोधी पक्षनेते पद मिळाले. त्यानंतर ना.स. फरांदे, सूर्यभान वहाडणे, मधुकरराव पिचड आणि युतीच्या काळात राधाकृष्ण विखे या नेत्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. निवडणुकीपूर्वी विखे हे भाजपवासी झाले. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी त्यांचे पारंपरिक विरोधक बाळासाहेब थोरात यांनी भरून काढली.  महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेत नगर जिल्ह्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली. थोरात यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला दुस-यांदा महसूल खाते मिळाले. नगरविकास व ऊर्जा, उच्च तंत्र शिक्षणही महत्वाची खाती प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आली आहेत.  जलसंधारण हे खाते मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे आहे. जलसंधारण हे खाते संभाळणारे  गडाख हे जिल्ह्यातील पहिले मंत्री आहेत.महसूल खाते तिस-यांदा नगरकडेतत्कालीनमंत्री बी. जे. खताळ यांनी महसूल खात्याचा कारभार पाहिला. त्यानंतर शंकरराव कोल्हे यांच्याकडे महसूल खाते होते. आघाडीच्या काळात तिस-यांदा बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने जिल्ह्याला महसूलमंत्रीपद मिळाले. या खात्याचा अनुभव असल्याने थोरात यांच्याकडे दुसºयांदा महसूल खाते देण्यात आले आहे.कृषी व महसूल खात्यावर नगरचा वरचष्माकृषी व महसूल ही दोन महत्वाची खाती नेहमीच नगरच्या वाट्याला आली. पहिल्यांदा गोविंदराव आदिक यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला कृषी मंत्री पद मिळाले. त्यानंतर अण्णासाहेब म्हस्के, शंकरराव कोल्हे, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे कृषी खाते होते. तसेच महसूल खाते जिल्ह्यात पहिल्यांदा खताळ यांना मिळाले. त्यानंतर शंकरराव कोल्हे यांनी या खात्याचा कारभार पाहिला असून, थोरात यांच्याकडे दुसºयांदा महसूल खात्याची जबाबदारी आली आहे.नगर जिल्ह्याने राज्याला दिले २० मंत्री१)रामराव आदिक- उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री २)बाळासाहेब भारदे- सहकार, विधानसभा अध्यक्ष३)बी.जे. खताळ- महसूल, सार्वजनिक बांधकाम, विधी न्याय४)बाबूराव भारस्कर- समाजकल्याण५)आबासाहेब निंबाळकर- पाटबंधारे, ग्रामविकास६)गोविंदराव आदिक- परिवहन, विधी व न्याय, कृषी७)शंकरराव काळे- शिक्षण, सहकार८)बबनराव ढाकणे- सार्वजनिक बांधकाम, विरोधी पक्षनेते९)अण्णासाहेब म्हस्के- पाटबंधारे, कृषी१०)एस.एम.आय. असीर- ऊर्जा, वक्फ११)शंकरराव कोल्हे- सहकार, महसूल, कृषी, परिवहन,राज्य उत्पादन,हंगामी सभापती, फळ उत्पादन, कमाल जमीन धारणा१२)मधुकरराव पिचड- दुग्ध व पशुसंवर्धन, बंदरे, रोजगार हमी, आदिवासी, वन, विरोधीपक्षनेते, जिल्ह्याचे पालकमंत्री१३)अनिल राठोड- अन्न,नागरी पुरवठा१४)राधाकृष्ण विखे- कृषी, जलसंधारण, दुग्ध व पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, शालेय शिक्षण, विधी व न्याय, पालकमंत्री (औरंगाबाद), परिवहन,बंदरे,विधी व न्याय,कृषी व पणन, पालकमंत्री (अमरावती), विरोधीपक्ष नेते, गृहनिर्माणमंत्री१५)बाळासाहेब थोरात- पाटबंधारे, कृषी, जलसंधारण, शालेय, शिक्षण, कृषी, रोजगार हमी,महसूल, खार जमीन, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, अपारंपरिक ऊर्जा, दुग्ध व पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, सध्या महसूल खाते.१६)बबनराव पाचपुते- गृह, वन, आदिवासी, पालकमंत्री१७शिवाजीराव कर्डिले- मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास१८)राम शिंदे- गृह, पर्यटन, राजशिष्टाचार, आरोग्य, जलसंधारण, जिल्ह्याचे पालकमंत्री.१९)शंकरराव गडाख- मृद व जलसंधारण२०)प्राजक्त तनपुरे- नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षणविखे- थोरात सर्वाधिक खात्यांचे मंत्रीआघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांच्याकडे महत्वाची खाती होती. थोरात व विखे हे जिल्ह्यातील सर्वाधिक खात्यांचा कारभार पाहिलेले नेते आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनministerमंत्री